‘नीट’ परिक्षेचा निकाल तर आला, आता पुढे काय ?

2021-04-28 467

अकोला:

गमों की ऑचपर आंसुओं को
उबालकर तो देखो
जो बनेंगे रंग किसी पर
डालकर तो देखें
चुभन तुम्हारे दिल की भी
ज़रूर कुछ कम होगी
किसीके पाँव में से
काँटा निकालकर तो देखो

हा सुप्रसिध्द शेर आठवायचं निमित्त म्हणजे
ज्या विद्यार्थी अन् पालकांनी राब राब राबून
जीवाचे रान केले . अहोरात्र झटले . एमबीबीएस चे स्वप्न साकार व्हावे म्हणुन
पाण्यासारखा पैसा खर्च केला . महागडे कोचिंग क्लास लावले .पण तरीही वाट्याला आली ती निराशा. असे लाखों पालक अन् हतबल लेकरे ह्यांच्या दु:खात आपणही सहभागी व्हावे त्यांच्या वेदनेवर हळुवार फुंकर मारावी म्हणुन माझा हा खारीचा वाटा.
समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणुन माझा हा अल्पसा प्रयत्न .
माझ्या मनातील भावना आपणासोबत शेअर करून
सुखाला बोलकं अन् दु:खाला हलकं करून
माझ्या मनातले ओझे कमी करण्यासाठीच
ही तळमळ.

नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. देशभरातून १५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपले नशीब आजमाले आहे. असे असले तरी निकालानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत असतात.

कोरोनाच्या काळात मुलांना परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी पाठवावे की नाही ? यासंदर्भात अकोला येथील प्रसिध्द साहित्यिक, अभ्यासक अॅड.अनंत खेडकर दिलेली ही माहिती. विशेष म्हणजे खास आपल्यासाठी ही मुलाखत घेतली आहे प्रसिद्ध सिने अभिनेता अमित्रियान पाटील यांनी. तर ही माहिती पहायला आणि शेअर करायला विसरू नका.

(व्हिडिओ - विवेक मेतकर)
#neet #mbbs #akola #anantkhedkar #education #foreign #students #parents

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires